Karnataka Rain: कर्नाटकात जोरदार वादळ आणि पाऊस, बंगळुरूमध्ये अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली (Watch Video)

बेंगळुरूमध्ये जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. एकीकडे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला असताना दुसरीकडे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. 15 जूनपर्यंत मान्सून मध्य भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. राजस्थानपासून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रापर्यंत अनेक राज्यांमध्ये तीव्र उकाडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन लोक आता पावसाळ्याची वाट पाहत आहेत.

पाहा पोस्ट -