Karnataka Govt Formation: बेंगळूरुत संध्याकाळी 5 वाजता CLP ची मिटींग, निरीक्षक म्हणून सुशीलकुमार शिंदे यांच्या सह तीन नेत्यांना कर्नाटकात पाठवले

काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज सायंकाळी 5 वाजता होणार आहे. ज्यामध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाऊ शकतो.

Sushilkumar Shinde

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापनेची कसरत सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस सिद्धरामय्या की शिवकुमार यांच्या पैकी कोणाकडे कर्नाटकाची कमान सोपवणार, याबाबत आज संध्याकाळी निर्णय होऊ शकतो. कारण काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज सायंकाळी 5 वाजता होणार आहे. ज्यामध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाऊ शकतो. त्याचवेळी, बैठक सुरू होण्यापूर्वी काँग्रेसने सुशील कुमार शिंदे, दीपक बावरिया आणि भंवर जितेंद्र सिंह यांना निरीक्षक म्हणून कर्नाटकात पाठवले आहे. हे नेते आज काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहणार असून, पक्ष हायकमांडला अहवाल सादर करणार आहेत.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement