Hubballi मध्ये PM Modi यांच्या ताफ्यात हार घेऊन घुसला मुलगा; सुरक्षा रक्षकांनी हटकून केले दूर (Watch Video)

कर्नाटकातील हुबळी मध्ये आज नरेंद्र मोदी पोहताच त्यांचं जंगी स्वागत झालं.

PM Modi | Twitter

कर्नाटकातील हुबळी मध्ये आज नरेंद्र मोदी पोहताच त्यांचं जंगी स्वागत झालं. रोड शो दरम्यान दुतर्फा लोकं उभी असताना गाडीतून मोदी अभिवादन स्वीकारत होते. पण अचानक एक मुलगा  त्यांची सुरक्षा भेदून आत घुसला. त्याच्याकडे हार  होता. एसपीजी च्या कड्या सोबत पंतप्रधान पुढे जात असताना आलेला तो मुलगा  मोदींजवळ पोहचला. मुलाला इतक्या जवळ जाताना पाहून सुरक्षा रक्षकांनी हटकलं. पण अशा स्थितीतही मोदींनी त्याच्याजवळील हार स्वीकारला. पण मुलाला नंतर रक्षकांनी दूर सारलं आणि मोदींचा ताफा पुढे गेला.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)