Jharkhand New CM: हेमंत सोरेन देणार पदाचा राजीनामा; Champai Soren असणार झारखंडचे नवीन मुख्यमंत्री

मुख्यमंत्री हेमंत सोरेन राजभवनात पोहोचले आहेत व ते राज्यपालांकडे आपला राजीनामा देऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.

Champai Soren Jharkhand New CM

Champai Soren Jharkhand New CM: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेची तलवार कायम आहे. अशात बातमी आली आहे की, चंपाई सोरेन हे झारखंडचे नवीन मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री हेमंत सोरेन राजभवनात पोहोचले आहेत व ते राज्यपालांकडे आपला राजीनामा देऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी माहिती दिली की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. चंपाई सोरेन यांची विधिमंडळ पक्षाचे नवीन नेते म्हणून निवड करण्यात आली आहे.

भाजप नेते अर्जुन मुंडा यांच्या 2 वर्षे 129 दिवसांच्या सरकारमध्ये चंपाई सोरेन यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आणि त्यांना महत्त्वाची मंत्रिपदे देण्यात आली. चंपाई 11 सप्टेंबर 2010 ते 18 जानेवारी 2013 पर्यंत मंत्री होते. यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आणि त्यानंतर हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा सरकारमध्ये चंपाई सोरेन यांना अन्न, नागरी पुरवठा आणि वाहतूक मंत्री करण्यात आले. हेमंत सोरेन 2019 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर, चंपाई सोरेन यांना परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री करण्यात आले. (हेही वाचा: CM Hemant Soren Lodges FIR against ED: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची कायदेशीर खेळी; ED विरुद्ध दाखल केला एफआयआर, जाणून घ्या सविस्तर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif