Indore Shocker: पार्टनरच्या सांगण्यावरून तरुणाने केले Sex Change Operation; नंतर प्रियकराचा लग्न करण्यास नकार, गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव वैभव शुक्ला असून तो उत्तर प्रदेशातील कानपूरचा रहिवासी आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित 2021 मध्ये सोशल मीडियावर आरोपीला भेटला होता.

प्रातिनिधिक प्रतिमा pc File image

Indore Shocker: सोशल मीडिया साईट्सवर दोन तरुणांमधील मैत्री आणि प्रेमप्रकरणाची एक अनोखी घटना समोर आली आहे. इंदूरच्या विजयनगरमध्ये इंस्टाग्रामवर एका मुलाची दुसऱ्या मुलाशी मैत्री झाली. दोघांचे बोलणे सुरु झाले व कालांतराने ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनतर या 28 वर्षीय तरुणाने जोडीदाराच्या सांगण्यावरून त्याचे लिंग बदलून घेतले, पण नंतर त्याच्या प्रियकराने त्याची फसवणूक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव वैभव शुक्ला असून तो उत्तर प्रदेशातील कानपूरचा रहिवासी आहे. पीडित 2021 मध्ये सोशल मीडियावर आरोपीला भेटला होता. वैभव शुक्लाने त्याच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पिडीत तरुणाने आपले लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया केली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर आरोपीने आश्वासन पूर्ण करण्यास नकार दिला. पिडीत तरुणाने (शस्त्रक्रियेनंतरची तरुणी) सांगितले की, वैभव शुक्लाच्या विनंतीनुसार, तसेच वैभवने लग्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याने आपले लिंग बदलले. मात्र नंतर वैभव शुक्लाने लग्न करण्यास नकार दिला. यानंतर पीडितेने विजय नगर पोलिसांशी संपर्क साधून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. (हेही वाचा: Rape Accused Flees Police Station in Mumbai: बलात्कार आरोपी बाथरूम ला जाण्याच्या बहाण्याने पोलिस स्टेशन मधून पळाला; पोलिसांनी पुन्हा आवळल्या मुसक्या)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now