India Hits Hard At China: चीनकडून प्रत्यक्ष सीमा रेषेवर अनेकदा शांतता भंग करण्याचा प्रयत्न, भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर
त्यामुळे एलएसीवरील शांतता भंग झाली.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (ministry of external affairs) सोमवारी आपला वार्षिक अहवाल २०२१-२२ सादर केला. यामध्ये मंत्रालयाने भारत आणि चीनमधील (China) द्विपक्षीय संबंधांचा उल्लेख केला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची (LAC) स्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न केला. असे प्रयत्न चीनकडून सातत्याने होत आहेत. त्यामुळे भारत-चीन द्विपक्षीय संबंधांवर परिणाम झाला आहे. अहवालानुसार, चीनने एप्रिल-मे 2020 पासून पश्चिम क्षेत्रातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती एकतर्फी बदलण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे एलएसीवरील शांतता भंग झाली. चीनच्या या प्रयत्नांना भारताकडून नेहमीच जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर देण्यात आले, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)