Anantnag Encounter: रॉकेट लाँचरमधून दहशतवाद्यांवर बॉम्बफेक, पहा लष्कराच्या कारवाईचा Video

त्यांना सोडले जाणार नाही. ऑपरेशन लवकर संपवण्यासाठी आमचे जवान सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

Enconter

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये तीन लष्कर आणि पोलीस अधिकारी आणि एका जवानाची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना कोकरनागच्या जंगलात सुरक्षा दलांनी घेरले आहे. 2-3 दहशतवादी जंगलातील टेकड्यांमध्ये लपून बसले आहेत. सुरक्षा दल दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी रॉकेट लाँचरने बॉम्बफेक करत आहेत. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पॅरा कमांडोही तैनात करण्यात आले आहेत.  गुरुवारी पहाटे चकमक परिसरातून तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले. डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, आम्ही दहशतवाद्यांना घेरले आहे. त्यांना सोडले जाणार नाही. ऑपरेशन लवकर संपवण्यासाठी आमचे जवान सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)