COVID 19 In India: भारतामध्ये पुन्हा वाढतेय कोरोना रूग्णसंख्या; एका दिवसांत 3,016 नवे रूग्ण, मागील 6 महिन्यांतील उच्चांक
13,509 सध्या अॅक्टिव्ह रूग्ण भारतामध्ये आहेत.
भारतामध्ये पुन्हा कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आज भारतामध्ये एका दिवसात 3016 नवे रूग्ण समोर आले आहेत. हा मागील सहा महिन्यातील उच्चांक आहे. 13,509 सध्या अॅक्टिव्ह रूग्ण भारतामध्ये आहेत. यामध्ये 14 मृत्यू देखील नोंदवण्यात आले आहेत. त्यापैकी तीन महाराष्ट्रात, दोन दिल्लीतून आणि एक हिमाचल आणि आठ केरळमध्ये दगावले आहेत. सध्या देशातील कोविड रूग्णांचा एकूण आकडा 5,30,862 वर आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)