भारताने पाकिस्तानच्या Kirana Hills मधील अणुऊर्जा प्रकल्प ला लक्ष्य केले? पहा IAF चा खुलासा
भारत-पाकिस्तान तणाव सध्या शांत असला तरीही भारताच्या वायुसेनेने ऑपरेशन सिंदूर थांबवलं नसल्याचं म्हटलं आहे. भारताकडून सध्या पाकिस्तान कडून हल्ला झाल्यास त्याला प्रतिसाद ऑपरेशन सिंदूर मधून दिलं जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.
भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील किराणा हिल्स येथील nuclear facility ला लक्ष्य केले नसल्याची माहिती हवाई दलाचे महासंचालक एअर मार्शल ए.के. भारती यांनी आज (12 मे) दिली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान एका प्रश्नाचे उत्तर देताना भारती म्हणाले, "किराणा हिल्समध्ये काही अणुऊर्जा प्रकल्प आहेत हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला त्याबद्दल माहिती नव्हती... आम्ही किराणा हिल्सवर हल्ला केलेला नाही, तिथे जे काही आहे ते." नक्की वाचा: Operation Sindoor Spy Alert: पाकिस्तानकडून बनावट व्हॉट्सअॅप कॉलद्वारे गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न.
किराणा हिल्स वरील हल्ल्याबाबतचा एअर मार्शल ए.के. भारती यांचा खुलासा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)