Income Tax Return Filing Deadline: 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी आयकर परतावा भरण्याची अंतिम मुदत 15 मार्च पर्यंत वाढवली

सध्याच्या कोविड-19 परिस्थितीमुळे करदात्यांना होणाऱ्या त्रासामुळे ही मुदत वाढवण्यात आली आहे

Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: PTI)

केंद्राने 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा तीन महिन्यांनी वाढवून ती आता 15 मार्च करण्यात आली आहे. ही मुदत गेल्या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत होती. आता करदाते 15 मार्चपर्यंत त्यांचे आर्थिक वर्ष 2021 चे आयकर रिटर्न भरू शकतात. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) मंगळवारी ही माहिती दिली. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, सध्याच्या कोविड-19 परिस्थितीमुळे करदात्यांना होणाऱ्या त्रासामुळे ही मुदत वाढवण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif