Himachal Pradesh: कुल्लू, मनालीसह शेजारील प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी; बर्फावर घसरणाऱ्या वाहनांचे व्हिडिओ व्हायरल (Watch)

अवजड वाहतूक मागे वळवण्यात आली आणि पोलिसांनी अटल बोगद्याला भेट देण्यासाठी आलेल्या सर्व पर्यटकांना परत मनालीला जाण्यास सांगितले आहे. येत्या काही दिवसांत आणखी बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

बर्फवृष्टी

हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि मनालीसह शेजारील प्रदेशांसह जोरदार बर्फवृष्टी होत आहे, ज्यामुळे रस्ते निसरडे झाले आहेत आणि परिणामी अनेक वाहने अटल बोगद्यामध्ये अडकली आहेत. कुल्लू आणि लाहौल-स्पीती जिल्ह्यातील उंच शिखरांवर सोमवार, 3 एप्रिल रोजी बर्फवृष्टी झाली. रोहतांग, बरलाचा, कुंझुम पास, शिंकुला पास आणि जालोडी खिंड तसेच अटल बोगद्यासह रोहतांगच्या उत्तर आणि दक्षिण पोर्टलवर अनेक ठिकाणी जोरदार हिमवृष्टी होत आहे.

वृत्तानुसार, अवजड वाहतूक मागे वळवण्यात आली आणि पोलिसांनी अटल बोगद्याला भेट देण्यासाठी आलेल्या सर्व पर्यटकांना परत मनालीला जाण्यास सांगितले आहे. येत्या काही दिवसांत आणखी बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असताना पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांनी डोंगराळ भागात जाण्यापासून दूर राहावे, असा सल्ला जिल्हा प्रशासनाने जारी केला आहे. मुसळधार बर्फवृष्टीमुळे रस्ते निसरडे झाले आहेत, ज्यामुळे वाहने चालवण्यात अडचण निर्माण होत आहे. सध्या बर्फावर घसरणाऱ्या वाहनांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

हे व्हिडीओ ट्विटर युजर वेदरमॅन शुभमने शेअर केले आहेत आणि त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘बर्फात सावधपणे गाडी चालवा.’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now