हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते केल्याच्या गुलाबराव पाटील यांच्या विधानावर पहा खुद्द Hema Malini यांची प्रतिक्रिया काय? (Watch Video)

गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं जाहीर केले आहे.

हेमा मालिनी (Photo Credits: PTI)

नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारामध्ये शिवसेना नेते, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एका सभेत आपल्या मतदारसंघातील रस्ते आपण हेमा मालिनींच्या गालासारखे केले असल्याचं वक्तव्य केलं आणि त्याची नंतर सर्वत्र चर्चा झाली. दरम्यान त्यांनी यावर दिलगिरी देखील व्यक्त  केली आहे. आज हेमा मालिनी यांनी देखील या वक्तव्याची दखल घेत, 'अशाप्रकरची वक्तव्य करण्याची सुरूवात लालू प्र्साद यादव यांनी केली आहे. पण अशाप्रकरच्या कोणत्याही महिलेवरून तुलनात्मक वक्तव्य करणं चूकीचं आहे. मी या गोष्टींकडे आता दुर्लक्ष करते' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

हेमा मालिनींची प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now