Snowfall In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील कुल्लूच्या रोहतांगमध्ये जोरदार बर्फवृष्टी, पर्यटकांनी घेतला आनंद-Video
मध्य भारत आणि उत्तर भारतातही काही दिवसांत मान्सून दाखल होईल.
हिमाचल प्रदेशातील कुल्लूच्या रोहतांगमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. येथे पोहोचलेल्या पर्यटकांनी बर्फवृष्टीचा भरपूर आनंद लुटला. जूनच्या पहिल्या आठवड्यात बर्फवृष्टी होईल, असे हवामान खात्याने आधीच जाहीर केले होते. बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक रोहतांगला पोहोचत आहेत. एकीकडे बहुतांश राज्यांमध्ये प्रचंड उष्मा असताना दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू झाला आहे. मध्य भारत आणि उत्तर भारतातही काही दिवसांत मान्सून दाखल होईल.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)