Delhi Rain Updates: दिल्लीमध्ये जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी साचले पाणी, वाहतुक कोंडीमुळे रस्त्यांवर वाहनांच्या रांगा (Watch Video)
हवामान खात्याने दिवसभरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दिल्लीचे प्राथमिक हवामान केंद्र असलेल्या सफदरजंग वेधशाळेने सकाळी 8.30 ते 11.30 दरम्यान 21.4 मिमी पावसाची नोंद केली. रिज वेधशाळेत 36.4 मिमी पावसाची नोंद झाली, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले.
दिल्लीकरांना शनिवारी पहाटेपासून दमदार पावसाचा सामना करावा लागला. हवामान खात्याने दिवसभरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दिल्लीचे प्राथमिक हवामान केंद्र असलेल्या सफदरजंग वेधशाळेने सकाळी 8.30 ते 11.30 दरम्यान 21.4 मिमी पावसाची नोंद केली. रिज वेधशाळेत 36.4 मिमी पावसाची नोंद झाली, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले. हवामा विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसा दिल्लीत पावसाने दमदार हजेरी लावली. परिणामी रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचले. इतकेच नव्हे तर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगाही लागल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली
दरम्यान, पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला एमसीडी (दिल्ली महानगरपालिका) किंवा इतर एजन्सींच्या अंतर्गत असलेल्या इतर भागांवर देखील पाणी साचल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आम्ही त्या तक्रारी पुढे पाठवल्या आहेत. आतापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आहे. गुरु तेग बहादूर खालसा कॉलेजच्या आजूबाजूचा रस्ता दिल्ली विद्यापीठाच्या उत्तर कॅम्पसमध्ये पाणी साचले, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
ट्विट
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)