HC On Freedom Of Speech: 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लक्ष्मणरेषा ओलांडली जाऊ नये’; भगवान शिवविरोधातील आक्षेपार्ह पोस्टवर उच्च न्यायालयाची टिप्पणी
या प्रकरणावर निर्णय देताना न्यायमूर्ती वीरेंद्र सिंग यांच्या खंडपीठाने नमूद केले की, अर्जदार एक सुशिक्षित व्यक्ती आहे. त्याला त्याच्या कथित पोस्ट आणि टिप्पण्यांचा परिणाम चांगल्या प्रकारे माहित आहे, तरीही त्याने अपमानास्पद पोस्ट केल्या.
सोमवारी, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने भगवान शिव आणि भगवान नंदी यांच्या विरोधात फेसबुकवर अपमानास्पद पोस्ट केल्याच्या आरोपावरून कलम 295A, 153A आणि 505 (2) अंतर्गत एफआयआरचा सामना करणार्या एका डॉक्टरचा अटकपूर्व जामीन नाकारला. अर्जदार (डॉ. नदीम अख्तर) याच्यावर आरोप आहे की, एका विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या अपमानास्पद पोस्ट केल्या आहेत. अख्तरने त्याच्यावरील एफआयआरविरोधात न्यायालयात धाव घेऊन जामीन अर्ज दाखल केला होता.
या प्रकरणावर निर्णय देताना न्यायमूर्ती वीरेंद्र सिंग यांच्या खंडपीठाने नमूद केले की, अर्जदार एक सुशिक्षित व्यक्ती आहे. त्याला त्याच्या कथित पोस्ट आणि टिप्पण्यांचा परिणाम चांगल्या प्रकारे माहित आहे, तरीही त्याने अपमानास्पद पोस्ट केल्या. न्यायालयाने पुढे नमूद केले की, समाजात राहताना प्रत्येक व्यक्तीने समाजातील इतर सदस्यांच्या धार्मिक श्रद्धेचा आदर केला पाहिजे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ‘लक्ष्मणरेषा ओलांडली जाऊ नये’. न्यायालयाने डॉ. नदीम अख्तर याची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)