Hathras Bus Accident: हाथरस येथे भीषण रस्ता अपघात; 12 जणांचा मृत्यू, 16 जखमी, ओव्हरटेक करताना बसने पिकअपला दिली धडक (Watch Video)
मृतांची ओळख पटवली जात आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Hathras Bus Accident: आज, 6 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एक भीषण रस्ता अपघात घडला, ज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे रोडवेजच्या बसने पिकअपला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात 16 जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. माहितीनुसार, खंडौलीजवळ एका ओव्हरलोड पिकअपला रोडवेज बसने मागून धडक दिली. पिकअपमध्ये 30 ते 32 जण होते असे सांगण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक (एसपी) निपुण अग्रवाल म्हणाले, आग्रा-अलिगढ राष्ट्रीय महामार्गावर बसने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात व्हॅनला धडक दिल्याने हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच जिल्ह्याचे डीएम आणि एसपी रुग्णालयात पोहोचले. मृतांची ओळख पटवली जात आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातात जखमी झालेल्या 16 जणांपैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (हेही वाचा; Raichur School Bus Accident: रायचूरमध्ये सरकारी बसची शाळेच्या बसला धडक; 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जण जखमी)
हाथरस येथे भीषण रस्ता अपघात-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)