Gurugram: G20 शिखर परिषदेसाठी लावलेल्या फुलांच्या कुंड्यांची आलिशान गाडीतून चोरी (Watch Video)
हा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून लोक ही या व्हिडीयोवर मजेदार कमेंट करत आहेत.
गुरुग्राममधून (Gurugram) समोर आलेल्या एका हायप्रोफाईल चोराचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) खूप चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये दिसत की दोन हाय प्रोफाईल लोक एका आलिशान कारमध्ये आले आणि गुरुग्रामच्या सहरोल सीमेवर थांबले. गाडीतून खाली उतरताच दोघांनी शहराच्या सुशोभिकरणासाठी लावण्यात आलेल्या फुलांच्या कुंड्या उचलण्यास सुरुवात केली. आणि मग एकामागून एक दोघांनी आपल्या गाडीत अनेक फुलांच्या कुंड्या भरल्या. आणि नंतर घटनास्थळावरुन पसार झाले. हा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल (Viral Video) झाला असून लोक ही या व्हिडीयोवर मजेदार कमेंट करत आहेत.
पहा व्हिडीयो -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)