Heavy Rain In Gujarat: अहमदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे झाड उन्मळून पडले, दोन गाड्याचे नुकसान
रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.
गुजरातमध्ये मान्सून दाखल झाला आहे. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अपघातही घडत आहेत. गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अहमदाबादच्या केके नगरमध्ये एक झाड उन्मळून दोन गाड्यांवर पडले. त्यामुळे दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या कारचा व्हिडिओही समोर आला आहे. दोन्ही गाड्या खराब झालेल्या रस्त्यावर पडल्या असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
मुसळधार पावसामुळे अहमदाबादमधील अनेक भागात पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)