Gujarat Fire: अहमदाबादमधील रुग्णालयात आग, 100 रुग्णांना सुखरूप बाहेर काढले
रुग्णालयाच्या तळघरातून सतत धूर निघत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे 100 रुग्णांना रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले आहे.
गुजरातमधील अहमदाबाद शहरातील एका बहुमजली रुग्णालयाच्या तळघरात आग लागली, त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे 100 रुग्णांना रुग्णालयातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. साहिबाग पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार, राजस्थान हॉस्पिटलच्या तळघरात पहाटे 4.30 वाजता आग लागली. पोलीस निरीक्षक एमडी चंपावत म्हणाले, "अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यात गुंतले आहेत. रुग्णालयाच्या तळघरातून सतत धूर निघत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे 100 रुग्णांना रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले आहे."
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)