Gujarat Fatal Accident: इंस्टाग्राम लाइव्हसाठी भरधाव वेगाने गाडी चालवत मित्रांचा धिंगाणा; अचानक झाला अपघात, 4 जणांचा मृत्यू (Watch Shocking Video)

या लाईव्ह इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये, रात्रीच्या वेळी पाच तरुण पार्टी करत, मोठ्या आवाजात गाणी वाजवत, 140 किमी/तास वेगाने कारमधून जात असल्याचे दिसत आहे.

Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Gujarat Fatal Accident: सध्याची तरुणाई अनेक गोष्टींबाबत किती निष्काळजी आणि बेपर्वा झाली आहे याचे एक धक्कादायक उदाहरण गुजरातमधून समोर आले आहे. गुजरातमधील वासद येथे एका महामार्गावर चालकाचे त्याच्या वेगवान कारवरील नियंत्रण सुटल्याने चार तरुणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. महत्वाचे म्हणजे जेव्हा हा अपघात झाला तेव्हा त्याचे इंस्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रीम सुरु होते. सध्या हे फुटेज सोशल मीडियावर फिरत आहे. या लाईव्ह इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये, रात्रीच्या वेळी पाच तरुण पार्टी करत, मोठ्या आवाजात गाणी वाजवत, 140 किमी/तास वेगाने कारमधून जात असल्याचे दिसत आहे. आपल्या फॉलोअर्ससाठी त्यांनी इतक्या वेगाने गाडी चालवण्याबाबतचा लाईव्ह सुरु केला होता. त्यानंतर अचानक ही कार एका भीषण अपघाताला बळी पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या अपघातामध्ये 4 जणांना आपला जीव गमवावा लागला. बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: Kolihan Mine Accident: राजस्थान येथे खाणीत लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा बाहेर कराढण्यात यश, एकाचा मृत्यू)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)