Uttarakhand: 'वर्षभरात नातू किंवा नात द्या, नाहीतर 5 कोटी नुकसानभरपाई द्या'; वृद्ध दाम्पत्याची मुलगा व सुनेविरुद्ध न्यायालयात धाव
या दाम्पत्याने हरिद्वारच्या जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे
आई-वडील आणि मुलांमध्ये मालमत्तेच्या वादाच्या बातम्या अनेकदा ऐकायला मिळतात, मात्र उत्तराखंडमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. हरिद्वारमध्ये एका वृद्ध जोडप्याने आपली सून आणि मुलाकडे नातवंडांची मागणी केली आहे, जर ते हे करू शकत नसतील तर त्यांनी प्रत्येकी 2.5 कोटी म्हणजेच एकूण 5 कोटी नुकसानभरपाईची द्यावी अशी या आई-वडिलांची मागणी आहे. या दाम्पत्याने हरिद्वारच्या जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्याची पुढील सुनावणी 17 मे रोजी होणार आहे. खटला दाखल करणारी व्यक्ती संजीव रंजन प्रसाद हे एकेकाळी BHEL मध्ये अधिकारी होती आणि आता ते निवृत्त झाले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)