Delhi Building Collapsed: दिल्लीत चार मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

दिल्लीच्या शास्त्रीनगर भागात एक चार मजली इमारत पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळली आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असुन दिल्ली पोलिसांनी या दुर्घटनेची पुष्टी केली आहे.

उत्तर दिल्लीच्या (North Delhi) शास्त्रीनगर (Shastri Nagar) भागात एक चार मजली इमारत पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळली आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असुन दिल्ली पोलिसांनी या दुर्घटनेची पुष्टी केली आहे. परिसरातील नागरिकांचं मोठं नुकसान झालं असुन वित्तहानी झाल्याची माहिती मिळत आहे. तरी जिवितहानी बाबत दिल्ली पोलिसांकडून कुठलीही माहिती देण्यात आली नाही. तरी सध्या घटनास्थळी पोलिस दाखल झाले असुन संबंधीत दुर्घटनेची सखोल चौकशी करत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement