WATCH- Raghuram Rajan Joins Bharat Jodo Yatra : RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन भारत जोडो यात्रेत सहभागी (पाहा व्हिडिओ)

राजस्थान येथील सवाई माधोपूर येथील भदोती येतून आज सकाळी यात्रेस सुरुवात झाली. यावेळी रघुराम राजन काही वेळासाठी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

Raghuram Rajan and Bharat Jodo Yatra

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. राजस्थान येथील सवाई माधोपूर येथील भदोती येतून आज सकाळी यात्रेस सुरुवात झाली. यावेळी रघुराम राजन काही वेळासाठी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर रघुराम राजन भारत जोडो यात्रेत सहभागी होतानाचा काही सेकंदांचा व्हिडिओ अपलोड केला आहे. आपल्याला माहितच असेल की काँग्रेस नेते राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करत आहेत. देशभरातील विविध राज्यांतून मार्गक्रमण करत असलेल्या या यात्रेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif