Revised Tax Slabs in New Tax Regime: बजेट 2024 मध्ये नव्या कर रचनेमध्ये बदल जाहीर; 3 लाखपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर नसेल असे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

बजेट । File Image

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यकडून नव्या कर रचनेमध्ये बदल जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सामान्य नोकरदारांसाठी  स्टॅडर्ड डिडक्शन 50 वरून 75 हजार केला आहे. तर पेंशनदारांसाठी  15 वरून 25 हजारांवर करण्यात आला आहे. 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर नसेल. 3 ते 7 लाख 5% , 7-10 लाख साठी 10% , 10-12 लाख साठी 15% आणि 12-15 लाख उत्पन्न असणार्‍यांना 20% टॅक्स असणार आहे.  15 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना 30% कर भरावा लागणार आहे. नवीन कर प्रणालीमध्ये पगारदार कर्मचाऱ्याची 17,500 रुपयांपर्यंत बचत होईल. सुमारे 37,000 कोटी रुपयांचा महसूल गमावला जाईल तर सुमारे 30,000 कोटी रुपयांचा महसूल अतिरिक्त एकत्रित केला जाईल. असेही त्यांनी म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)