First look of Ram Lalla in Ayodhya after Pran Partistha: अयोद्धेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा संपन्न; पहा श्रीरामांचे मोहक रूप (Watch Video)

Ram lalla | Twitter

अयोद्धेमध्ये अखेर रामलल्लांची 51 इंचची  मूर्ती विराजमान झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठेची पूजा संपन्न झाली आहे. ही कृष्ण पाषाणामधील मूर्ती आकर्षकपणे सजवण्यात आली होती. सोबतच रामलल्लाची जूनी मूर्ती देखील ठेवण्यात आली आहे. अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये पारंपारिक वाद्यांच्या नादामध्ये हा सोहळा पार पडला. मंदिरावर यावेळी चॉपर्सद्वारा पुष्पवर्षाव देखील करण्यात आला. हा मृगशीर्ष नक्षत्राचा मुहूर्त होता. आता उद्या 23 जानेवारीपासून सारे रामभक्त या मंदिरात रामलल्लांचं दर्शन घेऊ शकणार आहेत. Ayodhya Ram Mandir Inauguration Ceremony Live Streaming: अयोद्धेच्या श्रीराम मंदिरातील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video) .

पहा रामलल्लांचं मोहक रूप

मंदिरावर पुष्पवृष्टी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)