Yavatmal Video: शेतकरी ओढा ओलांडत असताना अचानक बैलगाडीसह पाण्यात वाहून गेला, यवतमाळ जिल्ह्यातील घटना

यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. याचदरम्यान एका गावातून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक शेतकरी आपल्या बैलगाडीसह नाला ओलांडत असताना अचानक बैलगाडीसह पाण्यात वाहून गेला.

Photo Credit: X

Yavatmal Video: यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. याचदरम्यान एका गावातून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक शेतकरी आपल्या बैलगाडीसह नाला ओलांडत असताना अचानक बैलगाडीसह पाण्यात वाहून गेला.हा व्हिडिओ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील उमरी कपेश्वरचा आहे. नाल्यात वाहून गेल्यानंतर बैल आणि शेतकरी दोघेही काही अंतरावर किनाऱ्यावर आले, मात्र बैलगाडीच्या मागे बांधलेली गाय व वासरू नाल्याच्या पाण्यात वाहून गेले.हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर @YourMatterz या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.हेही वाचा: Virar: विरारच्या अर्नाळा सुमुद्रात सहलीसाठी आलेला 17 वर्षांचा मुलगा बुडाला[Poll ID="null" title="undefined"]

व्हिडिओ पहा: 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now