Fact Check: देशातील विविध शहरांत सुरु झाली महिलांसाठी फ्री-राइडची सेवा?सोशल मिडियावर संदेश व्हायरल, पोलिसांकडून स्पष्टीकरण जारी
मात्र नंतर ती बंद झाली. परंतु हा लुधियाना पोलिसांचा नंबर महिलांसाठी मोफत राइड योजना म्हणून वेगवेगळ्या शहरांच्या नावाने व्हायरल होत आहे.
Fact Check: आजकाल सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की, पोलिसांनी महिलांसाठी मोफत राईड योजना सुरू केली आहे. यामध्ये कोणतीही एकटी महिला रात्रीच्या वेळी 10 ते सकाळी 6 च्या दरम्यान घरी जाण्यासाठी पोलीस हेल्पलाइन क्रमांक 1091 आणि 7837018555 वर कॉल करू शकते. त्यानंतर पोलीस तिला घरी जाण्यासाठी मदत करतील. पोलिसांचे वाहन महिलेला सुखरूप तिच्या घरी घेऊन जाईल. महिला या हेल्पलाइन क्रमांकांवर कधीही कॉल करू शकतात. ही सेवा संपूर्ण देशात लागू झाल्याचा दावा पोस्टमध्ये केला जात आहे.
मात्र आता ही पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. याआधी काही कालावधीसाठी ही सेवा लुधियानामध्ये सुरू झाली होती. मात्र नंतर ती बंद झाली. परंतु हा लुधियाना पोलिसांचा नंबर महिलांसाठी मोफत राइड योजना म्हणून वेगवेगळ्या शहरांच्या नावाने व्हायरल होत आहे. हा नंबर बेंगळुरू, हैद्राबाद आणि इंदूरच्या नावानेही व्हायरल झाला आहे. आता विविध शहरांमधील पोलिसांनी आपापल्या अधिकृत सोशल मीडियावरील पोस्टद्वारे अशी कोणतीही योजना अथवा सेवा सुरु नसल्याचे सांगितले आहे. तसेच हा संदेश खोटा असल्याची पुष्टी केली आहे. (हेही वाचा; West Bengal Shocker: पश्चिम बंगाल येथील रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, सिटीस्कॅन ऑपरेटर पोलिसांच्या ताब्यात)
देशातील विविध शहरांत महिलांसाठी फ्री-राइडची सेवा सुरु झाल्याचा संदेश व्हायरल-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)