EPFO Interest Rate Update: ईपीएफओ चा व्याज दर 8.25% होणार - सूत्रांची माहिती

CBT च्या निर्णयानंतर, 2023-24 साठी EPF ठेवींवरील व्याजदर सहमतीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवला जाईल.

EPFO | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ईपीएफओ कडून 2023-24 चा व्याजदर 8.25% करण्यात येणार असल्याची माहिती आहे. हा दर मागील 3 वर्षातील उच्चांकी व्याज दर ठरणार आहे. मार्च 2023 मध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2021-22 मध्ये 8.10 टक्क्यांवरून 2022-23 साठी EPF वर व्याजदर 8.15 टक्के केला होता. मार्च 2022 मध्ये, EPFO ​​ने 2021-22 साठी EPF वरील व्याज 2020-21 मध्ये 8.5 टक्क्यांवरून 8.1 % केला जो मागील 40 वर्षांतील निच्चांकी होता. CBT च्या निर्णयानंतर, 2023-24 साठी EPF ठेवींवरील व्याजदर सहमतीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवला जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement