Earthquake In Meghalaya: सोमवारी संध्याकाळी मेघालयात बसले भूकंपाचे जोरदार धक्के; 5.4 रिश्टर स्केलची तीव्रता, जीवितहानी नाही

या भूकंपामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र या भूकंपामुळे अनेक इमारतींना हादरे बसले आणि लोक घराबाहेर पळून गेले.

Earthquake

आसाम आणि मेघालयात सोमवारी रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी 5.4 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुराच्या काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप जवळजवळ 6 सेकंदांपर्यंत चालला आणि दोन लाटांमध्ये आला, सुरुवातीचे धक्के कमी तीव्रतेचे होते आणि त्यानंतर जास्त तीव्र मध्यम तीव्रतेचे होते. असे मानले जाते की भूकंपाचा केंद्रबिंदू भारतीय सीमेजवळ बांगलादेशातील सिल्हेट शहरापासून 55 किमी उत्तर-पूर्वेला होता. या भूकंपामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र या भूकंपामुळे अनेक इमारतींना हादरे बसले आणि लोक घराबाहेर पळून गेले. (हेही वाचा: Mobile Blast in Uttar Pradesh: अलिगडमध्ये रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खिशात मोबाईलचा स्फोट; गंभीर जखमी)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement