Delhi Shocker: चमत्कार ! 15 मिनीट वॉशिद मशिनमध्ये होता चिमुरडा; 7 दिवस कोमा राहिल्यानंतर मृत्यूला दिली मात

Washing-Machin

नवी दिल्लीत (New Delhi)  एक दिड वर्षाचा चिमुरडा हा वॉशिंग मशीन (Washing Machin) मध्ये पडला. मशीनमध्ये साबणाचे पाणी होते आणि त्यात तो चिमुरडा (Baby) जवळपास 15 मिनीटापर्यंत होता. जेव्हा ही गोष्ट चिमुरड्याच्या आईच्या लक्षात आली त्यावेळी त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. सात दिवस कोमामध्ये वेंटिलेटरवर राहिल्यानंतर त्याला आता चिमुरड्याची तब्येत आता ठिक आहे आणि त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

चिमुरड्याची आई रुममधून बाहेर गेली असताना खुर्चीच्या मदतीने वर चढलेला चिमुरडा टॉप लोडिंग मशीनमध्ये पडला. यानंतर आईने त्याला बाहेर काढत जवळच्या रुग्णालयात नेले. जेव्हा ते रुग्णालयात पोहचले तेव्हा चिमुरडा कोणताच प्रतिसाद देत नव्हता तसेच तो श्वासही निट घेऊ शकत नव्हता. मात्र उपचारानंतर आता तो ठिक असून व्यवस्थित चालत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by The Tatva (@thetatvaindia)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)