Coronavirus: कोरोना नियंत्रणासाठी महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमध्ये केंद्राने पाठवली आरोग्य पथके
केंद्राने याबाबत चिंता व्यक्त केली आहे
सध्या कोरोना विषाणू संसर्गाबाबत महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगडची स्थिती फारच खराब आहे. केंद्राने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. केंद्राने महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाबमध्ये 50 सार्वजनिक आरोग्य पथके तैनात केली आहेत. या टीम्स महाराष्ट्रातील 30 जिल्हे, छत्तीसगडचे 11 जिल्हे आणि पंजाबमधील 9 जिल्ह्यांना भेट देतील. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही माहिती दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)