Cockroach Found in The Meal of Vande Bharat Train: वंदे भारत ट्रेनमध्ये जेवणात आढळले झुरळ, आयआरसीटीसीने मागीतली माफी (See Pics

IRCTC ने घटनेची नोंद घेतली आणि असा काही प्रकार घडल्याबद्दल पोस्ला प्रतिसाद दिला. या प्रतिसासदात आयआरसीटीसीने या अप्रिय अनुभवाबद्दल प्रवाशांची माफीही मागितली आणि संबंधित सेवा प्रदात्यावर मोठा दंड आकारण्यात आल्याची माहिती दिली.

Cockroach Found in The Meal | (Photo Credits: X)

वंदे भारत एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाला इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) द्वारे पुरविलेल्या अन्नामध्ये मेलेले झुरळ आढळून आले. ही घटना 1 फेब्रुवारी रोजी, राणी कमलापती ते जबलपूर जंक्शन दरम्यान घडली. प्रवाशाने दुपारच्या जेवणाचे अनेक फोटो X (पूर्वी Twitter) वर पोस्ट केले. ज्यामुळे हे प्रकरण बाहेर आले. तसेच, भारतीय गाड्यांमध्ये पुरविल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाविषयी चिंता व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. IRCTC ने घटनेची नोंद घेतली आणि असा काही प्रकार घडल्याबद्दल पोस्ला प्रतिसाद दिला. या प्रतिसासदात आयआरसीटीसीने या अप्रिय अनुभवाबद्दल प्रवाशांची माफीही मागितली आणि संबंधित सेवा प्रदात्यावर मोठा दंड आकारण्यात आल्याची माहिती दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now