Poonch Terror Attack: शहीद लान्स नाईक देवाशिष बसवाल यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत, ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची घोषणा
ते पुरी जिल्ह्यातील अल्गुम गावचे रहिवासी होते आणि 2021 मध्येच त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या मागे पत्नीशिवाय सात महिन्यांची मुलगी आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात देशाचे 5 शूर जवान शहीद झाले. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील पुंछ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लान्स नाईक देवाशिष बसवाल यांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी लान्स नाईक देवाशिष बसवाल यांच्या कुटुंबाप्रती संवेदना देखील व्यक्त केल्या आहेत.
शहीद जवान लान्स नाईक देबाशिष बिस्वाल हे ओडिशाचे रहिवासी होते. ते पुरी जिल्ह्यातील अल्गुम गावचे रहिवासी होते आणि 2021 मध्येच त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या मागे पत्नीशिवाय सात महिन्यांची मुलगी आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)