Air India Issued Advisory: विमानतळावर जाण्यापूर्वी तुमच्या फ्लाइटची स्थिती तपासा; एअर इंडियाने प्रवाशांसाठी जारी केली ॲडव्हायजरी
एअर इंडियाने प्रवाशांसाठी एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. एअरलाइनने प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचा सल्ला दिला आहे.
Air India Issued Advisory: शुक्रवारी दुपारपासून जगभरात हाहाकार पसरला आहे. मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन झाल्यानंतर जगभरातील विमानसेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान, एअर इंडियाने प्रवाशांसाठी एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. एअरलाइनने प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचा सल्ला दिला आहे. एअर इंडियाने X वर आपल्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे,तांत्रिक बिघाडांमुळे जगभरातील विमानतलाच्या प्रवास प्रणालींवर परिणाम झाला आहे आणि तुमच्या प्रवासाच्या योजनांवर देखील परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही आज आमच्यासोबत उड्डाण करत असाल, तर आम्ही तुम्हाला विनंती करतो की विमानतळावर जाण्यापूर्वी तुमची फ्लाइट स्थिती तपासा.हेही वाचा: Check-in Systems Down at Mumbai Airport: मुंबई एअरपोर्ट वर IndiGo, Akasa, SpiceJet च्या प्रवाशांच्या चेक इन सिस्टीम डाऊन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)