Champai Soren To Join BJP: झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन 30 ऑगस्ट रोजी मुलगा बाबुलालसह भाजपमध्ये प्रवेश करणार

गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशा परिस्थितीत आज त्याची अधिकृतरीत्या पुष्टी झाली.

Champai Soren (PC - Facebook)

Champai Soren To Join BJP: झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. 30 ऑगस्ट रोजी ते अधिकृतपणे पक्षाचे सदस्यत्व स्वीकारणार आहेत. दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे बंडखोर ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी X वर एका पोस्टमध्ये याची पुष्टी केली होती. त्यानंतर आता स्वतः चंपाई सोरेन यांनी एक्सवर याबाबत पोस्ट करत आपल्या भाजप प्रवेशाबाबत माहिती दिली आहे. चर्चा आहे की 30 ऑगस्टला चंपाई सोरेन यांच्यासोबत झामुमोचे अनेक बडे नेतेही भाजपमध्ये सामील होऊ शकतात.

झामुमो पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर चंपाई सोरेन यांनी आजच दिल्ली गाठली होती. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशा परिस्थितीत आज त्याची अधिकृतरीत्या पुष्टी झाली. चंपाई सोरेन म्हणतात, ‘आदिवासी अस्मिता आणि अस्तित्व वाचवण्याच्या या लढ्यात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंडमधील आदिवासी, मूलनिवासी, दलित, मागासलेले, गरीब, मजूर, शेतकरी, महिला, तरुण आणि सामान्य लोकांच्या समस्या आणि हक्कांसाठीच्या संघर्षाच्या या नव्या अध्यायात तुम्हा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.’ (हेही वाचा: Mayawati Re-Elected BSP President: बसपाच्या अध्यक्षपदी मायावती यांची एकमताने फेरनिवड)

चंपाई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif