Bollywood Drug Case: ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अरमान कोहलीला NCB ने चौकशीसाठी घेतले ताब्यात; प्रश्नांना दिली संदिग्ध उत्तरे
बिग बॉसचा माजी स्पर्धक आणि बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली अडचणीत सापडला आहे
बिग बॉसचा माजी स्पर्धक आणि बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली अडचणीत सापडला आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या टीमने अरमानच्या घरावर शनिवारी ड्रग्सच्या प्रकरणात छापा टाकला. एनसीबीच्या टीमकडून अजूनही याबाबत चौकशी सुरु आहे. छापेमारीनंतर अभिनेता अरमान कोहलीने एनसीबीने विचारलेल्या प्रश्नांना संदिग्ध उत्तरे दिली. त्यानंतर त्याला NCB कार्यालयात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. NCB झोनल डायरेक्टर (मुंबई) समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)