हिमाचल प्रदेशातील आर्थिक संकटावरून भाजपाची राहुल गांधीवर टीका

हिमाचल प्रदेश हे आर्थिक संकटात सापडले आहे. यावरुन आता भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप प्रवक्ते प्रेम शुक्ल यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधी तसेच काँग्रेसवर टिका केली आहे.

ते म्हणाले की  "काल हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याची आर्थिक दिवाळखोरी जाहीर केली. राहुल गांधी म्हणायचे की लोकांना पैसा 'खटखट' मिळेल. पण 'फटाफट' हिमाचल दिवाळखोरीत निघाले. 9 पहाडी राज्यांपैकी हिमाचल प्रदेश राज्यात सर्वात जास्त आर्थिक संकट आहे.  हिमाचलमध्ये दरडोई कर्जाचे मूल्य हे देशातील दुसऱ्या क्रमांकावर आहे. आजपर्यंत हिमाचलमध्ये OPS (जुनी पेन्शन योजना) लागू करण्यात आलेली नाही...अशीच परिस्थिती कर्नाटकात आहे... " असा आरोप प्रेम शुक्ल यांनी केला.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement