Bihar Bridge Collapse Video: बिहारमध्ये आणखी एक पूल कोसळला! सुलतानगंजमधील चार पदरी पुलाचा भाग गंगेत बुडाला (Watch Video)

पूलाचा भाग पाण्यात पडताच मोठा आवाज झाला. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आगवाणी-सुलतानगंज चौपदरी पुलाचा भाग कोसळण्याची ही तिसरी वेळ आहे.

Bihar Bridge Collapse Video (फोटो सौजन्य - X)

Bihar Bridge Collapse Video: बिहारमधील भागलपूरमध्ये पूल कोसळण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. शनिवारी सकाळी सुलतानगंजमधील गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या चौपदरी पुलाचा एक भाग अचानक कोसळला. गंगेच्या जोरदार प्रवाहाने तो वाहून गेला. गंगेला पूर आणि पाण्याचा जोरदार प्रवाह असताना ही घटना घडली. या घटनेमुळे खांब क्रमांक 9 वरील सुपर स्ट्रक्चरही वाहून गेले. पूलाचा भाग पाण्यात पडताच मोठा आवाज झाला. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आगवाणी-सुलतानगंज चौपदरी पुलाचा भाग कोसळण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 30 एप्रिल 2022 च्या रात्री जोरदार वाऱ्यामुळे 5 क्रमांकाचा खांब पडला होता. यानंतर 4 मे 2023 रोजी 9, 10, 11, 12 क्रमांकाच्या खांबांच्या सुपर स्ट्रक्चरचा काही भागही कोसळून गंगा नदीत बुडाला.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement