Bengaluru: भाडे वाढवून न देता रॅपीडो बाईक टॅक्सी बुक केल्याने ऑटो चालकाने प्रवाशाच्या अंगावर घातली रिक्षा (Watch Video)

पीडित प्रवाशाने त्याला जास्तीचे भाडे देण्यास नकार दिला आणि त्याने रॅपिडो बाइक बुक करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑटोचालक संतप्त झाला आणि त्याने प्रवाशाला धडक दिली.

Enraged Auto Driver Crashes on Techie (Photo Credit: Twitter/ @IANS)

रॅपिडो बाईकची वाट पाहणाऱ्या एका सॉफ्टवेअर व्यावसायिकाला ऑटोने धडक दिल्याची घटना बेंगळुरूमध्ये घडली आहे. पीडित प्रवाशाने त्याला जास्तीचे भाडे देण्यास नकार दिला आणि त्याने रॅपिडो बाइक बुक करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑटोचालक संतप्त झाला आणि त्याने प्रवाशाला धडक दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एचएसआर लेआउट सेक्टर वन परिसरात गुरुवारी पहाटे ३.३० वाजता ही घटना घडली. हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. फुटेजमध्ये पीडित व्यक्ती ऑटोचालकाशी काही वेळ बोलत असल्याचे आणि त्याच्या वाहनापासून दूर जात असल्याचे दाखवले आहे. नंतर ऑटो चालकाने अचानक त्याच्यावर आपले वाहन त्याच्यावर आदळले. (हेही वाचा, Tragic Accident Caught On Camera: रुग्णवाहिकेच्या धडकेत आजोबा-नातू जखमी, सीसीटीव्हीत कैद झाली अंगावर शहरा आणणारी घटना Watch Video))

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)