Bearded Groom: दाढीवाल्या वराचे लग्न नाही होणार, फक्त क्लीन शेव्ह असलेल्या लोकांचेच लग्न होणार, जाणून घ्या कोणी दिला हा आदेश

कधी कधी त्याची ओळखही लपून रहाते, असे मत या समितीने मांडले आहे.

Representational image (Photo Credits: Unsplash)

जयपूरमध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या समितीने एक अनोखा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार अशा कार्यक्रमांमध्ये फक्त क्लीन शेव्ह केलेले वरच सहभागी होऊ शकतात, लांब दाढी असलेल्याला वरांचे लग्न केले जाणार नाही. 30 मार्च रोजी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणार्‍या श्री क्षत्रिय कुमावत सामूहिक विवाह समितीने बोलावलेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.

गोविंदगडमध्ये झालेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष सत्यनारायण मावर व सचिव छोटूराम मावळ म्हणाले की, भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी नवऱ्या मुलाला क्लिन शेव्ह करून येण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाश्चात्य प्रभावाखाली, बरेच वर त्यांच्या लग्नाला लांब दाढी घेऊन येतात जे चांगले दिसत नाही. कधी कधी त्याची ओळखही लपून रहाते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)