Avalanche in Sikkim: सिक्कीममध्ये हिमस्खलन; 6 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी, 150 लोक बर्फात अडकल्याची भीती

गंगटोक ते नाथू ला पासला जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू मार्गावर दुपारी 12.20 वाजता ही घटना घडली.

Avalanche in Sikkim

सिक्कीमची राजधानी गंगटोकमध्ये मंगळवारी हिमस्खलनाची मोठी घटना घडली. यामध्ये 6 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 150 लोक बर्फात अडकल्याची माहिती आहे. याशिवाय अन्य 11 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. गंगटोक ते नाथू ला पासला जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू मार्गावर दुपारी 12.20 वाजता ही घटना घडली. याठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमी झालेल्या सहा जणांचा जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी गंगटोक येथील एसटीएनएम हॉस्पिटल आणि सेंट्रल रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now