England vs Australia Short Highlights: दुसऱ्या T20 मध्ये इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाचा 3 गडी राखून पराभव; मालिकेत 1-1 ने बरोबरी; येथे पहा हायलाइट

इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 3 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 193 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जेक फ्रेझर-मॅकगर्कने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली.

England vs Australia Short Highlights: दुसऱ्या T20 मध्ये इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाचा 3 गडी राखून पराभव; मालिकेत 1-1 ने बरोबरी; येथे पहा हायलाइट
Photo Credit - X

England National Cricket Team vs Australia National Cricket Team 2nd T20I 2024 Highlights: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया(England vs Australia) यांच्यात खेळवल्या जात असलेल्या 3 सामन्यांच्या T-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 3 गडी राखून पराभव केला. त्यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना 28 धावांनी जिंकला होता. कार्डिफच्या सोफिया गार्डन्स स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. या दुसऱ्या सामन्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार फिल सॉल्टने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाकडून जेक फ्रेझर-मॅकगुर्कचे पहिले अर्धशतक आणि जोश इंग्लिशच्या 42 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून 193 धावा केल्या. इंग्लंड क्रिकेट संघाने 19 षटकांत सात विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. लियाम लिव्हिंगस्टोनने 87 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. लियाम लिव्हिंगस्टोनशिवाय जेकब बेथेलने 44 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक 5 बळी घेतले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यातील काही क्षण दाखवले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2024 11:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).