Animal Cruelty in Jabalpur: शेतात गाय घुसली म्हणून शेतमालकाचे मुक्या प्राण्यावर अमानुष अत्याचार; प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवला लोखंडी रॉड, पोलिसांकडून अटक

या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शेतमालकाचा अमानवी चेहरा पाहायला मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे.

Man Inserts Iron Rod in Cow’s Private Parts for Tresspassing His Field in Madhya Pradesh

Animal Cruelty in Jabalpur: मध्य प्रदेशातील जबलपूरमधील पानगर भागात गायीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. येथे एका शेतकऱ्याने शेतात गाय घुसली म्हणून, आधी तिला लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण केली. यानेही त्याचे समाधान झाले नाही तेव्हा त्याने गाईच्या तोंडात व मूत्रमार्गात लोखंडी रॉड घुसवला. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शेतमालकाचा अमानवी चेहरा पाहायला मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे. ही घटना केवळ गायीवर झालेल्या हल्ल्याचीच नाही, तर तिच्यासोबतच्या अमानुष वागणुकीचीही आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे. आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी लोकांनी सुरू केली. या अमानुष कृत्याविरोधात गाय मालक अजय तिवारी यांनी पानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अजय सिंह यांनी सांगितले की, गायीच्या मालकाने एक व्हिडिओ जारी केला होता, ज्यामध्ये आरोपी मंशाराम पटेल गायीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करताना दिसत आहे. (हेही वाचा: Python Attack Snake Handler Video: साप हाताळणाऱ्या व्यक्तीवर विशाल अजगरने अनेकदा केला हल्ला, पाहा व्हिडिओ)

मुक्या प्राण्यावर अमानुष अत्याचार-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now