Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding Functions: अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची सुरुवात 'अन्नसेवा' द्वारा; जोगवाड गावात गुजराती जेवण वाढताना दिसलं जोडपं (View Pics)

अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जगभरातून मान्यवर, सेलिब्रिटी सध्या जामनगर मध्ये दाखल झाले आहेत.

Ambani | Twitter

गुजरात च्या जामनगरमधील रिलायन्स टाउनशिपजवळील जोगवाड गावात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सची सुरुवात अन्न सेवेने झाली आहे. मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांनी गावकऱ्यांना पारंपारिक गुजराती जेवण वाढत या सोहळ्याला सुरूवात केली आहे. राधिकाची आजी आणि आई-वडील वीरेन आणि शैला मर्चंट यांनीही अन्न सेवेत सहभाग घेतला. पुढील काही दिवस सुमारे 51 हजार स्थानिक लोकांना जेवण दिले जाणार आहे.

पहा अन्न सेवेमध्ये  अनंत अंबानी - राधिका मर्चंट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)