Amul Milk Price Hike: लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी जनतेला महागाईचा मोठा झटका! अमूलचे दूध प्रतिलिटर 2 रुपयांनी महागले
अमूलने देशभरात दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. मात्र, दुधाचे वाढलेले दर उद्यापासून म्हणजेच सोमवारपासून लागू होणार आहेत. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केल्याची माहिती देणारी एक नोट जारी केली आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल अवघ्या दोन दिवसांनी म्हणजे 4 जून रोजी जाहीर होणार आहेत. निकालांबाबत जनतेला आशा आहे की, निवडणुकीनंतर देशातील महागाई काही प्रमाणात कमी होईल. मात्र निकाल जाहीर होण्याच्या दोनच दिवस आधीच महागाईने हैराण झालेल्या जनतेला मोठा धक्का बसला. अमूलने देशभरात दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. मात्र, दुधाचे वाढलेले दर उद्यापासून म्हणजेच सोमवारपासून लागू होणार आहेत. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केल्याची माहिती देणारी एक नोट जारी केली आहे. यामध्ये अमूल गोल्ड, अमूल ताज आणि अमूल शक्ती यांचा समावेश आहे. अमूल ताज नाना पाऊच वगळता सर्व दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)