Ameen Sayani Passes Away: पंतप्रधान Narendra Modi, राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्याकडून शोक व्यक्त

राष्ट्रपती मूर्मू यांनी 'रेडियो श्रोत्यांसाठी एका युगाचा अंत झाला.' असं म्हणत सयानींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Ameen Sayani । File Image

ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांचे आज वयाच्या 91 व्या वर्षी मुंबईच्या एच. एन. रुग्णालयात निधन झाले आहे. सयानी यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. मोदींनी 'सयानींच्या कार्याद्वारे, त्यांनी भारतीय ब्रॉडकास्टमध्ये क्रांती घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांच्या श्रोत्यांशी एक अतिशय खास बंध जोपासला.'असं म्हणत त्यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळो अशी अपेक्षा व्यक्त केली आहे तर राष्ट्रपती मूर्मू यांनी 'रेडियो श्रोत्यांसाठी एका युगाचा अंत झाला.' असं म्हणत सयानींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement