Allahabad HC On Live-in Relation: लिव्ह-इन रिलेशन तुटल्यानंतर महिलांना स्वीकारत नाही समाज, म्हणून नाईलाजाने उचलावे लागते 'हे' पाऊल

न्यायमूर्ती सिद्धार्थ यांच्या खंडपीठाने 24 नोव्हेंबर 2022 रोजी अटक करण्यात आलेल्या आदित्य राज वर्माच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना ही निरीक्षणे नोंदवली.

Allahabad High Court (Photo Credit: Wikimedia Commons)

आपल्या विवाहित लिव्ह-इन पार्टनरवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका पुरुषाला जामीन मंजूर करताना, अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले की, लिव्ह-इन संबंध तुटल्यानंतर एका महिलेसाठी एकटे राहणे कठीण आहे. भारतीय समाज अशा संबंधांना सहजा सहजी स्वीकारत नाही. त्यामुळे एका महिलेकडे तिच्या लिव्ह-इन जोडीदाराविरुद्ध एफआयआर दाखल करण्याशिवाय पर्याय उरत नाही, जे सध्याच्या प्रकरणात घडले आहे.

न्यायमूर्ती सिद्धार्थ यांच्या खंडपीठाने 24 नोव्हेंबर 2022 रोजी अटक करण्यात आलेल्या आदित्य राज वर्माच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना ही निरीक्षणे नोंदवली. आदित्यला त्याच्या लिव्ह-इन पार्टनरशी लग्न करण्याचे वचन देऊन तिची फसवणूक केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now