Age of Consent in India: 'लैंगिक संबंध ठेवण्यासाठी संमतीचे वय 18 आहे, 16 नाही'; सेक्स रिलेशनशिप वयावर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
याआधी 2012 मध्ये देशात संमतीने लग्न करण्याची वयोमर्यादा 16 वर्षांवरून 18 वर्षे करण्यात आली होती. यानंतर पॉक्सो कायदा लागू झाला, त्यानंतर भारतीय दंड संहिता (IPC) मध्ये सुधारणा करण्यात आली.
Age of Consent in India: सर्वोच्च न्यायालयाने (SC) मंगळवारी परस्पर संमतीने लैंगिक संबंध ठेवण्याच्या वयाबद्दल महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. बार आणि बेंचच्या अहवालानुसार, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, बहुतांश लोकांना अजूनही माहिती नाही की, देशात सहमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय 16 वर्षे नसून 18 वर्षे आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार यांच्या खंडपीठाने पॉक्सो कायद्यांतर्गत एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान ही टिप्पणी केली. 2012 मध्ये देशात संमतीने लग्न करण्याची वयोमर्यादा 16 वर्षांवरून 18 वर्षे करण्यात आली होती. यानंतर पॉक्सो कायदा लागू झाला, त्यानंतर भारतीय दंड संहिता (IPC) मध्ये सुधारणा करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते, ते आता फेटाळण्यात आले आहे. (हेही वाचा: HIV Cases In Tripura: त्रिपुरामध्ये तब्बल 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह; 47 जणांचा मृत्यू, समोर आले धक्कादायक कारण)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)