लडाखच्या तुर्तुक सेक्टरमध्ये भीषण अपघात; 26 जवानांना घेऊन जाणारे वाहन नदीत पडले, 7 जवान शहीद, अनेक जखमी

हे वाहन गुरुवारी श्योक नदीत पडून सात जवानांचा मृत्यू झाला

Ladakh Road Accident. (Photo Credits: Twitter)

लडाखच्या तुरतुक सेक्टरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका वाहन अपघातात भारतीय लष्कराच्या 7 जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. इतर सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उत्तम वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत असल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. गंभीर जखमींना भारतीय हवाई दलाच्या मदतीने वेस्टर्न कमांडमध्ये हलवण्यात येत आहे. वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत पडल्याने ही घटना घडली. परतापूरच्या संक्रमण शिबिरातून सैनिकांचा हा जत्था सब सेक्टर हनीफच्या पुढच्या मोर्चाकडे निघाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराच्या वाहनात एकूण 26 जवान होते. हे वाहन गुरुवारी श्योक नदीत पडून सात जवानांचा मृत्यू झाला. वाहन रस्त्यावरून घसरून सुमारे 50 ते 60 फूट खाली श्योक नदीत पडले. घटनेनंतर सर्व 26 जवानांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे 7 जवानांच्या मृत्यूची पुष्टी झाली. तर उर्वरित जवानांवर उपचार सुरू आहेत. थोईसेपासून सुमारे 25 किमी अंतरावर हा अपघात झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)