Abhinav Arora Gets Death Threat: 'बाल संत बाबा' अभिनव अरोराला Lawrence Bishnoi गँगकडून जीवे मारण्याची धमकी; आई ज्योती अरोरा यांचा दावा (Watch Video)

अभिनवची आई ज्योती अरोरा यांनी सोमवारी याबाबत मोठा दावा केला.

Abhinav Arora aka Bal Sant Baba (Photo Credits: ANI)

Abhinav Arora Gets Death Threat: बाल संत या नावाने प्रसिद्ध असलेला 10 वर्षीय कंटेंट क्रिएटर अभिनव अरोराला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. अभिनवची आई ज्योती अरोरा यांनी सोमवारी याबाबत मोठा दावा केला. मथुरेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ज्योती अरोरा यांनी अभिनवला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकावल्याचा दावा केला. आज सकाळीच धमकीचा मेसेज आल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, 'आम्ही भक्तीमार्गावर चालत आहोत. आमच्या मुलाला अशा प्रकारे का धमकावले जात आहे?. रात्री एका नंबरवरून कॉल आला होता. आज सकाळी त्याच नंबरवरून धमकीचा मेसेज आला. या मेसेजमध्ये अभिनवची हत्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.' यासोबतच कुटुंबाला सुरक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, अभिनव अरोराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याला जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य मंचावरून खाली उतरण्याची सूचना करत आहेत. या व्हिडिओनंतर अभिनव सोशल मिडियावर ट्रोल होत आहे. (हेही वाचा; Abhinav Arora Approaches Mathura Court: अभिनव अरोरा उर्फ ​​बाल संत बाबाची मथुरा कोर्टात धाव; खोट्या दाव्यांबद्दल 7 यूट्यूबर्सवर गुन्हा दाखल करण्याची मागणी)

Abhinav Arora Gets Death Threat:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)